एक्स्प्लोर
Maharashtra Politics | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दिशेने वाटचाल | मुंबई | ABP Majha
भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'वेट अँड वॉचच्या' भूमिकेत असणार असल्याचं बोललं जातंय. राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याच्या दिशेने सर्व पक्षीयांची पावलं पडत असल्याचं पाहायला मिळतंय. 8 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता विधिमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल. केंद्रात भाजपचं सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निश्चिंत असल्याची चर्चा आहे. भाजप अल्पमतातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही असंही समजतंय. 2014 साली भाजपच्या बाजूने आकडे होते. मात्र यंदा आमदारांचे आकडे कमी पडत असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे तोडफोड किंवा बेरजेचे राजकारण करून सत्तास्थापनेचा कुठलाही प्रयत्न भाजपकडून होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















