New Delhi Tiranga Rally : ऑपरेशन सिंदूरमध्ये गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव, नवी दिल्लीत खास तिरंगा रॅली
New Delhi Tiranga Rally : ऑपरेशन सिंदूरमध्ये गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव, नवी दिल्लीत खास तिरंगा रॅली
इंडिया गेट ते कर्तव्यपथ भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मध्ये गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी एनसीसीचे विद्यार्थी, भारतीय नागरिक खांद्यावर तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. याचा आढावा घेत त्यांच्याशी बातचीत केली आहे.
हे ही वाचा..
राज्यात दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल (SSC Results) जाहीर आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये, कोकण विभागाने 98.8 टक्के निकाल घेत राज्यात बाजी मारली. महाराष्ट्रातील एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 94.10 लागला आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील भाई सथ्था नाईट स्कूल या रात्र शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेता चांगले यश मिळवलं आहे. येथील रात्र शाळेमध्ये (School) दहावीचे शिक्षण घेणारे माजी सैनिक अंकुश पानंमद आणि वडापाव विक्रेत्या मंगल रांधवन हे दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. अंकुश पानमंद यांनी 19 वर्षे देश सेवा केली असून सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अपूर्ण राहिलेले शिक्षण घेण्यासाठी त्यांनी रात्र शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि ते यावर्षी दहावी उत्तीर्ण झाले. अंकुश यांना दहावीमध्ये 60% गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा साहिल पानमंद हा देखील दहावीला होता, त्याला देखील 74 टक्के गुण मिळाले आहेत. दहावीच्या परीक्षेत एकाचवेळी बाप-लेक उत्तीर्ण झाल्याने पानमंद कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.























