Sharad Pawar Nashik : शरद पवार येवल्यात सभा घेणार, उर्वरित दौरा 8 दिवसांनी करणार
abp majha web team
Updated at:
07 Jul 2023 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांचा आज नाशिकमध्ये मुक्काम आहे. शरद पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधण्याची घोषणा केली असून त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होणार आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना उद्याच्या सभेत पवार काय उत्तर देणार, भुजबळ आणि अजित पवारांचा कसा समाचार घेणार हे उद्या स्पष्ट होईल. दरम्यान येवल्यातील सभेच्या तयारीसाठी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बैठक होणार आहे.