![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Oxygen Leak : रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतप्त प्रतिक्रिया
नाशिक : नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलीसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.
दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
![Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/20/4dad003f07ac67efee3672537625c452172940117558990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/17/aeda8128d38306f70b57ac64ff2498641729146007584719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/14/5a0eeb4038c37f7012a965c4cb99058e1728869444275719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/09/7c089798692bd96e2dc77105d34b2f491728449472146718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/03/af8d0eecbb424642e19ba8a8419715581727926348444718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)