Nashik Graduate Constituency : Satyajeet Tambe यांच्या निमित्तानं भाजप काँग्रेसला धक्का देणार का?
नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेंस अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी संपला. महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे अपक्ष लढणार आहेत. भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे या जागेवरील निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्यजित तांबेंच्या निमित्तानं भाजप कॉग्रेसला धक्का देणार का? असा सवाल उपस्थित होतोय.























