एक्स्प्लोर
Nanded : जगातील सर्वात मोठ्या अशोक स्तंभाची उभारणी, अनेक देशातून भिख्खू उपस्थित : ABP Majha
नांदेड जिल्ह्यातील दाभड येथे ३६ व्या अखिल भारतीय धम्म परिषदेचं आज उद्घाटन झालंय. श्रीलंका येथील भिक्कु अतुलनीय रतन थेरो यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलंय. नांदेड शहरातील चौकाचौकातून ढोल ताशांच्या गजरात ,लेझीम पथकासह बौद्ध भिक्कु आणि हजारो बौद्ध अनुयायी या धम्म रॅलीत सहभागी झाले होते. या धम्म परिषदेसाठी चीन, जपान,थायलंड, श्रीलंका, नेपाळसह जगभरातून बौध्द भिख्खू धम्मदेशना देण्यासाठी दाखल झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ धम्म परिषदेच्या ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या अशोक स्तंभाची उभारणीही करण्यात आलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र























