एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg च्या 300 कामगारांचं आंदोलन, 5 महिने पगार मिळाला नसल्याचा कामगारांचा आरोप
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नागपूर या टप्प्याचं लोकार्पण झालं. त्यावरून गाड्याही धावू लागल्या. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील पॅकेज सात या विभागातील तब्बल ३०० कामगारांनी आंदोलन पुकारलंय.. गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळत नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय. दरम्यान, हे काम करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पैसे दिले नसल्यामुळे कामागारांचे अडीच कोटींचे पगार थकल्याचं कबुल केलंय. त्याचसोबत पुढील आठवड्यापर्यंत कामगारांना पगार दिले जातील, असं आश्वासनही दिलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्रिकेट
महाराष्ट्र
मुंबई






















