Nagpur Rain Update : नागपुरात झालेल्या पावसामुळे औषध विक्रेत्यांना फटका : ABP Majha
नागपूर मध्ये झालेल्या मुसधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. आता त्या नुकसानीची दाहकता पुढे येत आहे. अयोध्या नगर भागातील नाल्याला आलेल्या पुराने साई मंदिरपरिसर पाण्याखाली गेल्याने तेथील नागरिकांच्या घरातील साहित्याचे, धन धान्याचे, कागद पत्राचे मोठे नुकसान झाले.
जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या उत्तरार्धात सगळी कसर भरुन काढली आहे. पाणीकपातीचा सामना करत असलेल्या मुंबईतही गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. गेल्या आठवड्यातील विकेंडमध्ये मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला होता. सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या (Mumbai Rain) सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली असून थोड्याथोड्या अंतराने मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी कार्यालयात आणि दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.