एक्स्प्लोर
Nagpur : प्राचार्य अपहरण प्रकरणाला वेगळं वळण, खंडणीसाठी मैत्रीणीनंच कट रचल्याचा दावा
नागपुरातील प्राचार्य बेपत्ता प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. प्राचार्याचं अपहरण त्यांच्याच एका मैत्रिणीनं ३० लाखांच्या खंडणीसाठी केलं होतं असा दावा करण्यात येतोय. काल संध्याकाळी प्राचार्य त्यांच्या घरी परतले. शुक्रवारी संध्याकाळी ते कामानिमित्त घराबाहेर पडले आणि त्यानंतर घरी परतले नव्हते. त्यांच्या फोनवर संपर्क साधला असता त्यांचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. या नंतर पोलिसांनी तपास सुरू केला मात्र काल संध्याकाळी ते स्वतः सुखरूप घरी पोहोचले आहेत. मात्र अपहरण करणारी मैत्रिण कोण आणि त्या अपहरण प्रकरणात आणखी कुणी सहभागी होतं का याचा शोध पोलीस घेत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
निवडणूक























