एक्स्प्लोर
Board Exam 2022: नागपूर आणि अमरावतीत बोर्ड परीक्षांसाठी वर्ग देण्यास शिक्षण संस्था महामंडळाचा नकार
नागपूर आणि अमरावतीत दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी वर्ग देण्यास शिक्षण संस्था महामंडळाने नकार दिला आहे. नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण संस्था संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान मिळत नसल्याने, महामंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी इमारती आणि इतर सोयी न देण्याचा निर्णय घेतलाय. थकीत वेतनेतर अनुदान तातडीने देण्यात यावा अशी मागणी महामंडळाने केली आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्र कुठून आणायचे असा पेच शिक्षण विभागासमोर निर्माण होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा























