Nagpur : नागपूर शहर पोलीस भरतीत डमी उमेदवार, तीन आरोपींना अटक; 8 ते 10 उमेदवार पोलिसांच्या रडारवर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर शहर पोलीस भरतीत मूळ उमेदवार ऐवजी डमी उमेदवारांना परीक्षेत बसवून भरती प्रक्रियेत घोळ घातल्याप्रकरणी अजून 8 ते 10 उमेदवार नागपूर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या पोलीस भरती रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर नागपूर गुन्हे शाखेने आधीच जयपाल कंकरवार, अर्जुन सुलाने आणि तेजस जाधव या तीन आरोपींना अटक केलीय. याप्रकरणी आणखी काही उमेदवारांनी परीक्षेत डमी उमेदवाराचा वापर केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता आहे. पोलीस विभागासह इतर शासकीय विभागात ही या रॅकेटने भरती प्रक्रियेत काही घोळ केले आहे का याचा तपासही पोलीस करत आहे.. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नागपूर शहर पोलीस पदाची भरती घेण्यात आली. यावेळी संपूर्ण भरती प्रक्रिया व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्हीत चित्रित करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेचे चित्रीकरण तपासत असताना काही उमेदवारांवर पोलिसांना संशय आला... मूळ उमेदवार ऐवजी डमी उमेदवारांनी लेखी व शारीरिक परीक्षा दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांची पडताळणी केली असता 12 ते 13 लाखात मूळ उमेदवाराएवजी डमी उमेदवाराला पोलीस भरती परीक्षेत पाठवून पास करून देण्यासाठी एक टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असली तरी पुढील तपासामध्ये अजून काही अटक याप्रकरणी होण्याची शक्यता क्लेमेंट या घोटाळ्याचा व्याप बराच मोठा असल्याचे समोर आले आहे.