Vanchit Bahujan Aghadi Sabha : संविधान सन्मान सभेची शिवाजी पार्क मैदानावर जोरदार तयारी
abp majha web team
Updated at:
25 Nov 2023 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVanchit Bahujan Aghadi Sabha : संविधान सन्मान सभेची शिवाजी पार्क मैदानावर जोरदार तयारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मुंबईत शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आलय. या सभेसाठी इतर पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. यासभेत नाना पटोलेही उपस्थित राहणार आहेत. देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला २५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्कवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.संविधानाने दिले काय, स्वातंत्र्य, समता, बंधूंचा आणि न्याय यावर चर्चा होणार आहे. मात्र भाषणातून प्रकाश आंबेडकर सरकारवरती मोठया प्रमाणावर टीका करण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क वरती सायंकाळी ४ वाजता महासभेला सुरुवात होईल