Mumbai Transgender Protest : तृतीयपंथी आंदोलकांचा पोलिसांसोबत वाद
तृतीयपंथीयांना पोलीस भरतीत त्यांच्याच गटातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी तृतीयपंथीयांनी आज मुंबईत आंदोलन केलं. तृतीयपंथीयांसाठी तयार केलेल्या महामंडळाला सक्षम करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. न्यायालयानं तृतीयपंथीयांना पोलीस भरतीत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. पण पोलीस भरतीत तृतीयपंथियांना महिला गटातून समाविष्ट करुन घेतलं जात आहे. त्याला तृतीयपंथीयांकडून विरोध करण्यात येत आहे. दरम्यान तृतीयपंथियांच्या मागण्यांसंदर्भात त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रालयात नियोजित भेट होऊ शकली नाही. राज्यातल्या अन्य प्रश्नांवर मुख्यमंत्र्याच्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठका सुरु होत्या. त्यामुळं तृतीयपंथियांनी मंत्रालय परिसरात गोंधळ घातला























