Water Crisis Thane:ठाणेकरांवर पाण्यासाठी लोन काढण्याची वेळ! वीस दिवसात एक कोटी रुपयांच पाणी विकत
घराची किंमत एक ते दीड कोटी पण त्याच घरात प्यायला एक थेंब पाणी नाही, ही परिस्थिती मराठवाडा किंवा विदर्भातील जिल्ह्याची नसून ठाणे शहरातली आहे. मोठमोठ्या गृहसंकुलात पाण्याविना लोकांना घर सोडायची वेळ आज आलीये. पाण्याच्या टँकरसाठी वीस दिवसात एका कॉम्प्लेक्सने जवळपास एक कोटी रुपये खर्च केलेत. हे वाचून धक्का बसला ना? पण, अशी परिस्थिती ठाण्यात आलीय. ठाण्यातील कोलशेत रोडवरील लोढा अमारा या कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाणी नसल्यामुळे खासगी टँकरच्या पाण्यावर येथील रहिवाश्यांना अवलंबून राहावं लागत आहे. जवळपास पाच ते सहा हजार कुटुंबं या ठिकाणी वास्तव्यास आहेत. प्रत्येकाने कोट्यवधीचे लोन काढून या ठिकाणी घर घेतली आहेत. पण, आता पाण्यासाठीदेखील वेगळं लोन घेण्याची वेळ या राहिवाश्यांवर आली आहे.























