Thackeray Group Celebration : संजय राऊतांच्या जामिनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे गटाचा जल्लोष
खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला आहे... पीएमएलए कोर्टानं संजय राऊ यांना जामीन दिल्यानंतर या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ईडीनं केलीए...त्यानंतर दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टानं ईडीची राऊतांच्या जामिनावरील स्थगितीची मागणी फेटाळली... दरम्यान जामिनावरील स्थगिती फेटाळल्यानंतर ईडीनं थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय ... त्यामुळे आता दुपारी साडेचार वाजता हायकोर्टात सुनावणीची शक्यता आहे... दरम्यान हायकोर्टातली सुनावणी पूर्ण होईपर्यंत संजय राऊतांना कोर्ट परिसर सोडण्यास मनाई करण्यात आलीए... त्यामुळे आता हायकोर्टात काय निर्णय लागतोय याकडे लक्ष आहे....























