Ravindra Waikar : उशीरा का होईना; सत्यमेव जयते, क्लीन चीटनंतर वायकरांची Exclusive प्रतिक्रिया
Ravindra Waikar : उशीरा का होईना; सत्यमेव जयते, क्लीन चीटनंतर वायकरांची Exclusive प्रतिक्रिया रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) क्लीन चीट मिळाल्याची माहिती मिळत आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.