Shivaji Park : नारायण राणेंनी दर्शन घेतल्याने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण
मुंबई : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे शिवसेना-राणे यांच्यातील वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे. नारायण राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्यास आधीपासूनच शिवसैनिकांनी विरोध केला होता.
नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले आहे. त्यामुळे दूध, गोमुत्र आणि फुले टाकून शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे. अप्पा पाटील आणि इतर शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे.























