Pravin Darekar Mumbai Bank : सत्तांतरानंतर मविआला आणखी एक धक्का, प्रवीण दरेकर पुन्हा बँकेचे अध्यक्ष?
abp majha web team
Updated at:
05 Aug 2022 10:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. आता मुंबई बँकेतही सत्तांतर होणार असून भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर पुन्हा बँकेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबै बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई बँकेच्या उद्या पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचे अवघ्या सहा महिन्यांत मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावर पुनरागमन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.