Pravin Darekar Mumbai DCCB : सहकार विभागाचा प्रवीण दरेकर यांना दणका ABP Majha
मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोधात निवडून गेलेले प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलंय. सहकार विभागाने ही कारवाई केलीय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने तुम्ही मजूर आहात का अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. यावर चौकशी करुन सहकार विभागाने दरेकर मजूर नसल्याचा अहवाल दिलाय. दरेकरांना अपात्र ठरवताना विधानपरिषद निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्राकडे लक्ष वेधण्यात आलंय. या प्रतिज्ञापत्रात दरेकर यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलंय. तसंच दरेकर यांची मालमत्ता २ कोटी ९ लाख असून त्यांच्यावर ९० लाखांची संपत्ती असल्याचंही प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून दरमहा अडीच लाख मानधन मिळत असल्याने मजूर म्हणता येणार नाही असं सहकार विभागाने स्पष्ट केलंय.






















