Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरोधातील सर्व आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने मागे घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील संभाव्य खटला कायमस्वरूपी बंद झाला आहे. अदानींविरोधातील आरोप सिद्ध होणार नाहीत, असा निष्कर्ष वकिलांनी काढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गौतम अदानी यांनी ६० लाख डॉलर आणि सागर अदानी यांनी १.२० कोटी डॉलर भरण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी त्यांना आपण कोणतेही गैरकृत्य केल्याचे स्वीकारणे किंवा नाकारणे गरजेचे नाही. यानंतर, इराणमधून एलपीजी आयात करून अमेरिकी निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेच्या अर्थ विभागाच्या ‘ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल’ने (ओएफएसी) मागे घेतला आहे. त्यासाठी अदानी समूहाने तपासामध्ये व्यापक सहकार्य करण्याचे मान्य करण्याबरोबरच स्वतःहून काही माहिती उघड केली, तसेच २७.५० कोटी डॉलर भरण्याचेही मान्य केले. यामुळे गौतम अदानी, सागर अदानी आणि अदानी समूहाविरोधात अमेरिकेतील विविध नियामक आणि कायदेशीर तपास गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये बंद करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात ‘यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ने गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधातील सौरऊर्जा प्रकल्पाबाबत सुरू केलेली कायदेशीर कारवाई थांबवली. पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका, हे सगळं सरकारच्या गैरमार्गानं आलं आहे, राऊतांचा आरोप...





















