Bandra Building Collapse : मुंबईतील वांद्र्यात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, चार जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2021 09:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत रात्री उशिरा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आणि यासोबतच इमारत दुर्घटनाही घडली. मुंबईच्या वांद्रेमधल्या खेरवाडी परिसरातील रझाक चाळीत चार मजली घराचा भाग कोसळला. रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले असून त्यांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.