Sanjay Raut on CBI | भाजपची सत्ता नससेल्या राज्यात सरकारी यंत्रणांचा गैरवापर : संजय राऊत
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच, बिगर भाजप शासित राज्यांमध्ये यंत्रणेंचा गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला तपास करता येणार नाही, असा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. हा निर्णय योग्य असल्याचंही संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, 'महाराष्ट्र आहे, सीबीआय असेल, ईडी असेल यांना थोडेफार तपासाचे अधिकार आहेत. त्या अधिकारांचा गैरवापर, जिथे विरोधकांची राज्य आहेत, आपल्या विचारांची राज्यं नाहीत त्यांना त्रास देण्यासाठी, बदनाम करण्यासाठी कोणी करत असेल तर नाईलाजाने राज्याच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. पश्चिम बंगालमध्ये हा प्रसंग आला आहे. आंध्रमध्येही आहे. अजून एकदोन राज्यामध्येही आहे. महाराष्ट्र शेवटचं राज्य आहे. संयमाचा बांध तुटल्याने, कडेलोट झाल्यानेच हा निर्णय झाला."






















