Mumbai Rains : मुंबईत आजही पावसाची संततधार; ठाणे-सीएसएमटी वाहतूक विस्कळीत
मुंबई : येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचसोबत नैऋत्य वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. वसई-विरार आणि पालघरमध्ये देखील सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
मुंबईची लाईफलाईन सुरळीत
मुंबईत संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. तर सध्या ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल स्टेशनवर थांबून आहेत. मुंबईकडे जाणारे ट्रॅक पाण्याखाली आहेत. पातळी वाढते त्यामुळे लोकल वाहतूक बंद झाली आहे. जर असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे आणि हार्बर या मार्गावरची लोकलसेवाही ठप्प होऊ शकतो.