Mumbai : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे; वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरण्याचं काम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2021 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई... पावसाळा आणि खड्डे हे समीकरण नवीन नाही. मुंबई महापालिकेकडून काम न झाल्यानं आता थेट वाहतूक पोलिसांनीच खड्डे भरणीचं काम हाती घेतलंय. मुंबईतील अंधेरी पूर्व ते पश्चिमेला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे सकाळी-संध्याकाळी पीक अवरला या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होतेय. त्यामुळे आता मुंबई वाहतूक पोलिसांच्या अंधेरी शाखेत काम करणारे पोलीस हवालदार संजय परदेशीच आता या मार्गावरील खड्डे भरण्याचं काम करताहेत. मुंबई महापालिकेनं खड्डे भरलेले नसल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता चक्क स्वत: वाहतूक पोलीसच खड्डे भरण्याचं काम करताना दिसताहेत.