Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28 Sepember 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : : 28 Sepember 2024
ाझ्याकडे जे खातं आलं त्या खात्याचा उपयोग मी जनतेसाठी केला गरीब नागरिकांच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले मोफत उपचार केले नाही तर तुरुंगात कसं टाकायचं मला माहिती आहे, त्यामुळे डॉक्टर माझं निमुटपणे ऐकतात राज्यातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेचा कायदा केला जन्मापासून मृत्यूपर्यंतंच्या सगळ्या योजना घेतल्या विधानसभा निवडणूक दोन विचारांची आहे एका बाजूला मी गोरगरिबांची दिवसरात्र कामं करतो दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधकांना तुरुंगात घालून काम करणारी वृत्ती आपल्या तालुक्यात आहे या प्रवृत्तीनं मला शरद पवारांना सोडण्याची वेळ आणली त्या प्रवृत्तीला आपण ठेचलेच पाहिजे मी शरद पवारांना गुरुदक्षिणा दिली पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला पहिल्या चार वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काम करून घेतले मात्र गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली त्यावेळी फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला माझ्यावर दबाव आणून 4000 नागरिकांच्या पेन्शन बंद करायला लावल्या गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम त्यांनी केलं स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक नेहमी म्हणायचे या सरंजामशाहीला सत्ता कशाला पाहिजे त्यांना त्यांची संपत्ती सांभाळायची आहे गेल्या 13 वेळा जे झालं नाही ते आता कसं होईल, तुम्ही काय काळजी करू नका कुपेकर कुटुंबियांनी सांगावं गेल्या दोन निवडणुकीत त्यांच्या पाठीशी कोण होत तुम्ही सगळे गावागावात काम करा, एक लाख मतापेक्षा जास्त मताधिक्याने मी निवडून येणार या निवडणुकीत अशी कुस्ती मारायची की थेट छाताडावर बसायचं त्यांनी हात जोडून म्हटलं पाहिजे की उठा आता मगच उठायचं