Mumbai Local Jumbo Mega block : आज मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक
Mumbai Local Jumbo Mega block : आज मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर एकाच वेळी महा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगाब्लॉक असेल, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा 36 तासांचा मेगाब्लॉक असेल, या दोन्ही मेगाब्लॉकमुळे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण 956 लोकल रद्द केल्या जाणार आहेत, तर या तीन दिवसात एकूण 72 लांब पल्यांच्या गाड्या देखील रद्द असतील, ज्या लोकल सुरू असणार आहेत त्या देखील कर्जत कसारा ते दादर आणि भायखळापर्यंतच धावतील, सी एस एम टी ते भायखळा पूर्णतः बंद असेल, त्याचप्रमाणे हार्बर लाइनवर देखील पनवेल पासून घड्याळापर्यंतच लोकल धावतील, त्यापुढे लोकल धावणार नाहीत, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना याचा नक्कीच त्रास होणार आहे, मात्र त्या बदल्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आणि ठाणे स्थानकातील पाच आणि सहा नंबर फलाटाची प्रवासिक क्षमता वाढवण्यासाठी हे काम गरजेचे आहे असे मध्य रेल्वे कडून सांगण्यात आले आहे, सहा महिने ज्या कामासाठी लागतील तेच काम केवळ 63 तासांमध्ये ठाणे स्थानकात करण्यात येईल, हे काम नेमके कसे असेल आणि आज रात्रीपासून सुरू होणारा मेगाब्लॉक संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर....