Highcourt on Parking परवडतं म्हणून एका कुटुंबाला 4-5 गाड्या ठेवण्याची परवानगी का देता? :हायकोर्ट
मुंबईतील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. त्यावरुनच मुंबई हायकोर्टानं आज राज्य सरकारला खडेबोल सुनावलेत. हल्ली दोन इमारतींच्या मधल्या रस्त्यांवर कार पार्किंगलाही जागा नसते. तरी, परवडतं म्हणून एका कुटुंबाला ४-५ गाड्या ठेवण्याची परवानगी का देता? असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारलाय. पार्किंगची जागा असेल तरच नवं वाहन खरेदीची परवानगी द्यायला हवी, अशी सूचनाही मुंबई हायकोर्टानं केली. प्रशासनानं आता अंडरग्राऊंड बहुमजली पार्किंगचा गांभीर्यानं विचार करायला हवा असा सल्लाही कोर्टानं दिलाय. नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय.























