Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 02:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतील बंगल्यातल्या अनधिकृत बांधकामाबाबत हायकोर्टानं दिलासा दिलाय. महापालिकेनं पाठवलेल्या नोटिशीवर तूर्त कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयानं दिलेत. राणेंनी बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनवणी घेऊन निकाल द्या, असे आदेश न्यायालयानं महापालिकेला दिलेत. महापालिकेचा निर्णय राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कारवाई न करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिलेत. त्यामुळे महापालिकेचा निकाल विरोधात गेल्यास पुन्हा न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे आहे.