एक्स्प्लोर
Ganeshotsav 2021 : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून सूचनांची नियमावली जाहीर ABP Majha
मुंबई : गेल्यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावटं होतं. त्यामुळे गेल्यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा यासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. यामध्ये गतवर्षीच्या नियमवाली कायम राहील असं ठरलं आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येईल.
सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट, तर घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी. तसेच गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांनी घ्यावी, अशा अटी असणार आहेत.
गणोशोत्सवासाठी नियमावली काय आहे?
- सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट.
- घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी
- गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळानी घ्यावी.
- 84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाण.
- विसर्जन ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती द्यावी लागेल.
- नंतर महापालिकेमार्फत गणेश विसर्जन होणार.
- सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी केवळ 10 कार्यकर्त्यांना परवानगी मिळणार.
- लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाला जाऊ नये.
- मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी.
मुंबई
Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वर
Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्ज
Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement