(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis:कर्नाटकात काँग्रेसने शिवरायांचा पुतळा काढला या प्रकरणी पवार ठाकरे गप्प का?:फडणवीस
Devendra Fadnavis:कर्नाटकात काँग्रेसने शिवरायांचा पुतळा काढला या प्रकरणी पवार ठाकरे गप्प का?:फडणवीस
हे पूर्ण शुद्ध पद्धतीने राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडीला माझा सवाल आहे की त्यांनी लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतलं असे इंदिरा गांधी यांचं एक तरी भाषण दाखवाव, पंडित नेहरू यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार का..? इतके वर्ष काँग्रेसने शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं असं इतिहास शिकवलं, शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं मात्र जाणीवपूर्वक आम्हाला इतिहास शिकवण्यात आला त्याबद्दल ती माफी मागणार का..? मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथ यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर ने हटवण्याच पाप काँग्रेसने केलं त्याची महाविकास आघाडी माफी मागणार का..? कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुडवला हटवला गेला त्याकरिता काँग्रेस माफी मागणार का..? भाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचा आंदोलन करत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली शिवप्रेमींची माफी मागितली त्यानंतरही राजकारण करण हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे, ही निवड शुद्ध राजकारण आहे, काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान केला त्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने अगोदर माफी मागितली पाहिजे. शरद पवार स्वतः संरक्षण मंत्री असताना त्यांनी नेव्हीला कटगऱ्यात उभ करून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावायचे हे त्यांना तरी मान्य आहे का. पन्नास वर्षे शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जगभरातील शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे....