Congress Protest : विधीमंडळ परिसरात काँग्रेसचं UNCUT आंदोलन, नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात
abp majha web team
Updated at:
05 Aug 2022 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Protest : काँग्रेसने (Congress) आज (5 ऑगस्ट) महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर एक पाऊल पुढे जात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे.