परमबीर सिंह यांच्या आरोपांची CBI चौकशी होणार; परमबीर यांच्या याचिकेवर हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांनी जनहित याचिका दाखल केल्या होत्या. तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढत 15 दिवसांत सीबीआयला प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यायाने महाविकास आघाडीला धक्का समजला जात आहे.
राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, असा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे. या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.
दरम्यान हायकोर्टाच्या या निकालानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज























