Corona Patient Beds : मुंबईत बेड्सचा काळाबाजार, पालिकेच्या यंत्रणा विकल्या गेल्यात : आशिष शेलार
मुंबई : एबीपी माझाने आज (12 मे 2021) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड आरक्षित बेडची अनधिकृतपणे विक्री होत असण्याविषयीची बातमी प्रसारित केली होती. या बातमीची अत्यंत गंभीर दखल महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या रुग्णालयांमधील बेड वितरणाबाबत अत्यंत काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. आता दररोज सकाळी बेड विषयक आढावा घेण्याचेही निर्देश आयुक्त महोदयांनी दिले आहेत. त्याचबरोबर अशाप्रकारे बेडची विक्री करणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.























