Ramdas Kamat : ज्येष्ठ अभिनेते रामदास कामत कालवश, 90 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास
Pandit Ramdas Kamat Passed Away : रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचं शनिवारी रात्री विलेपार्ले इथल्या त्यांच्या निवासस्थानी वृध्दापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. पंडित रामदास कामत यांनी धि गोवा हिंदू असोसिएशनच्या 'संगीत संशय कल्लोळ' या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अठरा संगीत नाटकांमधून काम केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत, नातू अनिकेत, नातसून भव्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.





















