Vare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 एप्रिल 2024
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन सभा, सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यात महायुतीच्या चारही उमेदवारांसाठी जाहीर सभा
महाविकास आघाडीचे मुंबई, ठाणे, नाशिकमधील उमेदवार आज अर्ज दाखल करणार, अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार.
माझ्यासमोर कुठल्याही पक्षाचं आव्हान नाही, निश्चितपणे हॅटट्रिक करणार, अरविंद सावंतांचा विश्वास तर क्रांतीची मशाल पेटत राहील राजन विचारेंची प्रतिक्रिया
महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे अर्ज भरणार, शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार