UNCUT : "हे महाविकास आघाडी नव्हे, महावसुली आघाडी सरकार", मंत्री प्रकाश जावडेकर यांची राज्य सरकारवर टीका
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लॉकडाऊन, कोरोना आणि सचिन वाझे प्रकरणावर राज्य सरकारवर स़कून टीका केली आहे. सोबतच देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय. "सरकरानं रेडमीसिवीरच्या संदर्भात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण मागच्याही वेळी आपण पाहिलं की, रेडमीसिवीरच्या काळा बाजार काही लोकं करत होते. आताही हिच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. मुळातच आताची कोरोनाची दुसरी लाट आहे, ती देशातील सर्व राज्यांमध्ये नाहीये, तर ती काहीच राज्यांमध्ये आहे. मागची लाट ही सगळ्या राज्यांमध्ये होती. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये लाट नाही, त्या ठिकाणाहून आपल्याला रेडमीसिवीर घेता येईल का? याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.




















