Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Uddhav Thackeray on Maharashtra Drought: सरकारने गेल्यावर्षी 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपयांची घोषणा केली होती. मात्र, यातील प्रत्यक्ष मदत किती शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली, याची माहिती महाराष्ट्राला मिळायला हवी. हवामान खाते व आंतरराष्ट्रीय संस्थांनी मोसमाच्या सुरुवातीलाच दुष्काळाचा अंदाज वर्तवला होता. ही शक्यता लक्षात घेऊन सरकारने आधीपासून दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना केल्या, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. दुष्काळीच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशनाची मागणी ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार किंवा तिबार पेरणी करावी लागत आहे. परिस्थिती भयानक असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, धरणे-विहिरी भरणे आणि आगामी रब्बी हंगामासाठी समाधानकारक पाऊस व्हावा, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी केली.
जशी मी कर्जमुक्ती केली होती, आजसुद्धा जिथे जिथे जाल तिथे सगळे शेतकरी सांगतात की 15 दिवसात त्यांना कोणताही निकष वगैरे न तपासता, म्हणजे सरसकट सगळ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली होती. गेल्यावर्षी जाहीर केलेलं पॅकेज किती शेतकऱ्यांना मिळालं, आता तुम्ही जाहीर केलेली कर्जमाफीची योजना, त्यानु




















