Udayan Raje Bhosle: उदयनराजे भोसलेचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान : ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jun 2022 06:58 PM (IST)
Udayan Raje Bhosle: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. यावेळी उदयनराजे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. 'हिंमत असेल सगळ्यांची ईडी चौकशी करा. कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. साताऱ्यातील एमआयडीसीचा विकास हा टक्केवारीच्या नेत्यांमुळे रखडला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे.