Uday Samant On sanjay Raut : अजितदादा बरोबर बोलले, राऊत विद्वान माणूस ; सामंतांचा राऊतांवर हल्लाबोल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत थुकण्याचे प्रकार दोन वेळा केलेत. पत्रकार हे लोकशाहीचा तिसरा स्तंभ असून त्यांच्यासमोर अश्या प्रकारे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता थुंकन म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. सध्या महाराष्ट्रात हिन दर्जाचे राजकारण आणि वक्तव्य सुरू असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या प्रश्नावर थुंकणे हा पत्रकारीतेचाही अपमान आहे. रोज सकाळी साडेनऊ वाजता उठून लोकांची बदनामी करायची हा काही लोकांचा धंदा झाला असल्याची टीका उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. अजित दादा बोलले ते बरोबर आहे, हे फारच विद्वान आहेत. त्यांच्यावर कोणीच काही बोलू शकत नाहीत, एवढे हे विद्वान आहेत असा टोलाही उदय सामंत यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.




















