Nagpur Highway Accident : जबलपूर महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात, 10 प्रवासी जखमी
abp majha web team
Updated at:
01 Jun 2023 04:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मरारवाडी जवळ ट्रॅव्हल्स चालकाला झोप आल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उलटल्याची घटना आज दि.1 जून ला सकाळी घडली. या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, जबलपूर कडून नागपूर कडे देव दर्शनावरून येत असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक PY 01 CU 5791 च्या चालकाला मरारवाडी परिसरात झोप आल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स ही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. घटनेच्या वेळेला ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास 35 ते 40 प्रवाशी होते...