TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 16 May 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस, लोनेर परीसरात गारपीटीसह पाऊस, आणखी जोरदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये जोरदार वादळासह पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचे मोठं नुकसान, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा .
साताऱ्यातील कोयना परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा.
साताऱ्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि शिरवळ परिसरात अवकाळी पाऊस, अवकाळी पावसामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठात शुकशुकाट, अनेक ठिकाणी पर्यटकांनी घेतला पावसाचा आनंद.
पुण्याच्या खेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुुकसान, तर नागरिकांची उकाड्यापासून सुटका.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव , शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान.
लातूर शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण, ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाऊस झाल्याची माहिती.
पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या अवकाळी पावसाच्या जोरदार सरी, डहाणू तालुक्यातील कासा, उरसे चारोटी, परिसरात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्गमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस, अवकाळी पावसामुळे आंबा, जांभूळ पीक अडचणीत.
चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस, पावसाच्या आगमनाने उष्णतेने त्रस्त नागरिक सुखावला, तर आंबा बागायतदार चिंतेत.