Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 30 August 2024 : 7 PM
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझेड प्लस सुरक्षेसंदर्भात शरद पवारांच्या घरी बैठक, शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारल्याची माहिती, शरद पवारांच्या अटी-शर्तींबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर करणार. अंतिम निर्णय अजून नाही.
नांदगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसृष्टीचं लोकार्पण होणार, शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह, १०० जेसीबींतून मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार.
छत्रपती संभीजनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी केली क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी, जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना.
कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांना हवामान विभागाचा इशारा, आज उद्या आणि परवा समुद्रात ३५ ते ४० किलोमीटर प्रतीतास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज, खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन.
२१ वर्ष बंद असलेल्या बोअरवेलमधून अचानक ५० फूट उंच पाण्याचे फवारे. नंदुरबारच्या खोंडामळीमधील घटना. बोअरवेलचं पाणी आटल्यानं शेतकऱ्यानं दगड ठेवून बोअरवेल केली होती बंद. पावसामुळे बोअरवेलला आलं पाणी.
आदिवासी विकास महामंडळाचा हजारो क्विंटल धान खराब, गोडाऊन नसल्याच्या फटका, योग्यवेळी धानाची उचल न केल्यामुळं धान खराब झाल्याचा केंद्र अध्यक्षाचा आरोप.