Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 September 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 September 2024: ABP Majha
शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके द्यायला हवें असं वक्तव्य.
अनिल बोंडे नाही, गुंडे, राहुल गांधीवरील बोडेंच्या वक्तव्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांची टीका, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे केली कारवाईची मागणी.
अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना मनोरुग्णालयात दाखल करा, अनिल बोंडेंनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांची टीका.
राहुल गांधींच्या जीवाला धोका, काही लोक त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी रणनीती आखतायत, संजय राऊतांचा मोठा दावा.
राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सक्षम, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, बावनकुळेंचं विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर.
संजय गायकवाड, अनिल बोंडेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, मात्र राहुल गांधींचीही आरक्षणाबाबतची भूमिका अयोग्य, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य.