TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM : 20 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या पश्चिम उपनगरांमधे सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी, तर बोरिवलीमधे 171 मिमी पावसाची नोंद.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेला आंबोली घाटाला ढगांनी व्यापलं, आंबोली घाटाच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ.
रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरात ठीक ठिकाणी साचले पाणी, शहरातील तीन बत्ती, बाजारपेठ ,भाजी मार्केट परिसरात दोन फुटांपर्यंत साचलं पाणी
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस, रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवर परिणाम, अनेक भागात पाणी साचण्यास सुरूवात.
देशात जून महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस, हवामान विभागाची माहिती, तर जूनच्या उरलेल्या दिवसांत काही प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज.
सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी, हवामान विभागाची माहिती, चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज.
मुसळधार पावसामुळं डोंबिवलीतल्या सागर्ली परिसरात साचलं पाणी, चाळींमध्येही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल, रस्त्यांना नदीचं स्वरुप .