Special Report Thane Marathi GR : मराठी भाषा दिनी मराठीचीच गळचेपी, मनसे संतप्त, महापालिकेवर मोर्चा
Special Report Thane Marathi GR : मराठी भाषा दिनी मराठीचीच गळचेपी, मनसे संतप्त, महापालिकेवर मोर्चा
मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठीवर अन्याय, ठाणे महानगरपालिकेने काढले परिपत्रक मराठीतून एम ए चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतन वाढ न देण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय काय म्हटले परिपत्रकात- महापालिकेने काढलेल्या परिपत्रकात महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये शिक्षणावर आधारीत अतिरिक्त वेतनवाढी देय असण्याबाबत शासन निर्देश अद्याप प्राप्त झालेले नाही. यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए(मराठी) व तत्सम अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाºया अतिरिक्त वेतनवाढीबाबत प्रशासनाने अंतिम निर्णय आवश्यक असल्याचे निरिक्षण मुख्य लेखा परिक्ष यांनी नोंदविले होते. या निरिक्षणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आल्याने आता यापुढे अशा प्रकारचे शिक्षण घेणाºयांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे जे अशा पध्दतीने शिक्षण घेणार असतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे परिपत्रकार नमुद करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील जे अधिकारी, कर्मचारी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए(मराठी) व तत्सम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतात. त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती. तसा निर्णय महासभेत घेण्यात आला होता पालिकेकडून कालच हे परिपत्रक काढण्यात आले






















