Special Report On Tejaswini Ghosalkar : तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी
Special Report On Tejaswini Ghosalkar : तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी
तेजस्विनी घोसाळकर मातोश्रीवर गेल्या नाहीत तेजस्विनी घोसाळकरांकडून अद्याप भुुमिका स्पष्ट नाही उद्धव ठाकरे यांनी घोसाळकरांंना सकाळी साडे अकरा वाजता मातोश्रीवर बोलावलं होतं तेजस्विनी घोसाळकरांच्या नाराजीच्या चर्चेवरून ठाकरेंनी भेटीस बोलावले होले मात्र तेजस्विनी घोसाळकरांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली नाही तेजस्विनी घोसाळकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा..
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवले. या कारवाईनंतर सोमवारी (दि. 12 ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आश्रयावर असलेल्या दहशतवाद्यांना ठाम आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला. या कारवाईत भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून, 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. भारताच्या विरोधात होणारा कोणताही दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही आणि त्याला कठोर आणि सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोचरी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मोदींचे भाषण हे एक नंबरचे बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचे भाषण नव्हते. आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवले. नाहीतर पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते.






















