Solapur Maratha Akrosh Morcha : मोर्चा अडवला तर संघर्ष होणार हे नक्की : नरेंद्र पाटील
सोलापुरातील मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला तर उद्रेक होईल असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे. सोलापूरच्या इतिहासात कधीही इतके बॅरिगेट्स लावले नव्हते, पण तरीही लाखो बांधव मोर्चात सहभागी होणार आहे. कितीही दबाव टाका, पण मोर्चा निघणार, अडवला तर संघर्ष होणार हे नक्की असही पाटील म्हणाले. तर पोलिसांचा दबावासाठी वापर करता लाज वाटत नाही का? असा सवाल यावेळी नरेंद्र पाटील यांनी सरकारला विचारला. मराठा समाजातील तरुणांनी लढण्यास तयार होण्याचं आवाहन करत, आत्महत्येसारखी पावलं कुणी उचलू नये असेही पाटील म्हणाले. संपूर्ण राज्यभरातून मराठा समाजाचे बांधव सोलापूरमध्ये मोर्चात दाखल होणार आहेत. आता यापुढे राज्यभर विनापरवाना मोर्चे काढले जातील असा इशारा नरेंद्र पाटील यांनी सरकाला दिलाय.






















