Solapur Accident News Update : वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू ABP Majha
Solapur Accident News Update : सोलापुरात वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्व प्रवासी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील रहिवाशी असून एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावजवळ हा अपघात झाला.
सोलापूरमध्ये वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. मालट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात 6 जण जखमी झाले असून चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. ट्रॅक्टरमध्ये एकूण 22 प्रवासी होते. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवाशी आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ हा अपघात झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















