![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी
Shrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्फोटाच्या भीषण आवाजानंतर काही वेळातच आगीचे व धुराचे लोळ परिसरात पसरले होते. डोंबिवलीतील या भीषण स्फोट दुर्घटनेत 4 ते 6 कामगारांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मात्र, सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर, उद्योगमंत्री उदय सामंत हेही घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
![Aaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/cdfb353c65ec9092f502c829d34a9eaf1733758328258976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Arvind Sawant : चंद्रचूड यांनी न्यायालयाला चूड लावली, अरविंद सावंतांची बोचरी टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/a5d8c5e49374713ff15d666cd26431bb1733757898783976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/055cc54abdf8d5d39a1b3e724024af671733757243509976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/17543b01f6151d91bca3724ddae0af5a1733751349507976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uday Samant on Jayant Patil : जयंत पाटीलांचं भाषण ऐकण्यासारखं होतं, उदय सामतांनी केलं कौतूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/7ab27a36c58e9fa3aaf2e06f77dedb3d1733747765595976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)