Shravan Somwar 2021 : आज शेवटचा श्रावणी सोमवार, Pandharpurच्या Vitthal मंदिराला आकर्षक फुलांची आरास
आज पवित्र श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार. या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भक्त युवराज मुचलंबे यांनी विठ्ठल चरणी फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. आज सोमवती अमावास्या आणि श्रावणी सोमवार असल्यानं हरिहराचं प्रतीक असलेल्या विठ्ठल मंदिरात अत्यंत मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबी मध्ये रंगसंगती साधत फुलांचे पडदे, फुलांची झुंबरं आणि मंडप बनविण्यात आला असून विठ्ठल रुक्मिणी समोर फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या देखील घालण्यात आल्या आहेत. झेंडू, गुलछडी, गुलाब, लिली अशा विविध रंगांच्या फुलांचा या सजावटीसाठी वापर केला असून विठ्ठल मंदिरातील कर्मचारी असलेल्या शिंदे बंधू यांनी ही आकर्षक फुल सजावट साकारली आहे.

















